top of page
Search
Writer's pictureOmkar Mangesh Datt

पुस्तक – नाटक – सिनेमा

Updated: Mar 18, 2020

क्रिस्टोफर ब्रुक नावाच्या एका लेखकाने त्याच्या पुस्तकात म्हंटलं आहे जगात कथानकाचे बेसिक ७ प्लॉटच आहेत... आपण जे काही पाहतो ते त्या सात प्लॉटच्या भोवती विणलेल असतं.. लांब कशाला जा अगदी आपले सलीम जावेद (कानांना हात लावून) सुद्धा मानतात की सगळ्या कथानकांच मूळ हे महाभारतात आहे.. त्या बाहेरचं आपण काहीही लिहीत नाही.. हे सगळं ऐकल्यावर हे जाणवतं की कथानकं तीच तीच असतात गम्मत असते ती त्यांच्या मांडणीत आणि त्यासाठी निवडलेल्या माध्यमात.. म्हणूनच पुस्तक वर नाटक... नाटकावर सिनेमा.. सिनेमा वर नाटक असा या कथानकांचा माध्यम प्रवास सुरूच असतो.. आपल्याकडे याची अनेक उदाहरण आहेत.. वाजे पाऊल आपले या नाटकावर आधारित मेरे बिवी की शादी.. बनगरवाडी, निशाणी डावा अंगठा, दुनियादारी या कादंबर्यांवर वर बनलेले त्याच नावाचे सिनेमे.. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट या नाटकांवरून झालेले सिनेमे.. आणि अगदी मोरूची मावशी या नाटकावर गोविंदाने काम लेलेला टुकार आंटी नंबर वन... अशी अगणित उदाहरण आपल्याकडे सापडतात... माध्यमातील हा बदल करताना मूळ कथावस्तूत लिबर्टीच्या नावाने काही बदल केलेही जातात.. कथानक बदललं जातं कित्येकदा शेवटी एक वेगळाच चित्रपट बनतो.. (३ इडियट्स चं उदाहरण – लुजली बेस्ड ऑन 5 point someone) परदेशात सुद्धा असे अनेक अॅडॅप्टेशन्स केले जातात.. तिथेही फसणारी अनेक उदाहरण असतील पण त्यातल्या जी उदाहरण माझ्या आजपर्यंत पाहण्यात आली आहेत ती खरच अद्वितीय आहेत..


३९ स्टेप्स 1915 साली 39 स्टेप्स नावाची जॉन बुचानची एक साहस कादंबरी आली होती.. त्याच्यावर लुजली बेस्ड अशी फिल्म बनली 1935 साली जीचही नाव होतं 39 स्टेप्स.. त्या सिनेमाचा दिग्दर्शक होता अल्फ्रेड हीचकॉक.. एक अगदी सीरियस थ्रिलर सिनेमा होता.. 2005 साली या दोन्ही माध्यमांवर आधारित थ्रिलर पण धमाल विनोदी असं नाटक लिहिण्याची आइडिय आली पॅट्रिक बारलोव या लेखकाला आणि त्यातूनच वेस्टएंडला साकारल एक अद्वितीय नाटक – दी 39 स्टेप्स... हे नाटक साकारताना त्या लोकांनी काय भन्नाट कमाल केली आहे राव... मी सिंनेमा पाहिलाय.. त्यात अनेक लोकेशन आहेत अनेक पात्र आहेत.. आऊट डोर आहे.. चेज आहे.. नाटकात ते सगळं त्या लोकांनी तंतोतंत उभं केलं आहे.. स्टेजवर सगळं घडतं आणि त्यातही गम्मत ही आहे की हे सगळं साकारतात फक्त 4 कलाकार... एक मुख्य कलाकार जो एकच रोल करतोय आणि दोन पुरुष आणि एक महिला आलटून पालटून 150 एक भूमिका साकारतात... या नाटकाला सेट नाही.. काही ठोकळे काही चौकटी आणि बेसिक फर्निचिर पण यातूनच ते चार कलाकार – ट्रेन, जंगल, गाडी, राजवाडा, नदी असं सगळं काही उभं करतात.. त्यांच्या कपड्यातही बेसिक बदल होतात पण आपल्या अभिनयाने अगदी 150 पात्र ते आपल्यासमोर उभी करतात.. कधीकधी फक्त तीन लोक रंगमंचावर असतात पण ते मिळून चार पात्र साकारतात.. त्यांची एनर्जी, त्याचं टायमिंग सगळं इतकं अविश्वसनिय आहे की हळू हळू आपण स्टेज, चार कलाकार, नसलेल नेपथ्य हे सगळं विसरतो आणि कथेत गुंतून पडतो.. या नाटकाने प्रभावित होऊन केदार दादाने (केदार शिंदे) ढँटढँड नावाचं एक मराठी नाटक केलं होतं.. आणि ते माझं आम्ही केलेलं सगळ्यात फेव्हरेट नाटक आहे.. वर बोनस म्हणून त्यासाठी मला सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी झी मराठी नाट्य गौरव पुरस्कारही मिळाला होता..

39 स्टेप्स ची एक झलक : https://youtu.be/fEgahTK1awU


वॉर हॉर्स वॉर हॉर्स सुद्धा असच अजून एक भन्नाट उदाहरण म्हणता येईल.. याचा प्रवास जरा वेगळा आहे.. माइकल मोरपूरगो (असच काहीतरी आडनाव) असलेल्या लेखकाच्या 1982 साली लिहीलेल्या बेस्ट सेलर कादंबरीवर निक स्टाफोर्ड नावाच्या लेखकाला नाटक लिहायची इच्छा झाली.. माइकलने त्याला वेड्यात काढलं.. या कादंबरीवर नाटक होऊच शकत नाही असं त्याचं ठाम मत होतं.. कारण कादंबरीचा हीरो होता एक घोडा आणि कादंबरीच नाव होतं.. वॉर हॉर्स.. पहिल्या विश्वयुद्धाच्या काळात घडणारी ही एका घोड्याच्या बालपणापासून ते वयस्कपणा पर्यन्तची कथा आहे आणि 2007 साली जेव्हा या कथेवर आधारित नाटक वेस्ट एंडच्या रंगमंचावर आलं तेव्हा लोकं भारावून गेले.. वॉर हॉर्समध्ये खरोखर रंगमंचावर एक घोडा काम करतो.. लहानपणापासून ते अगदी वयस्क होई पर्यन्त... पण हा घोडा काही खरा नाही.. वॉर हॉर्सच्या प्रॉडक्शनने खूप मेहनतीने कळसूत्री बाहुली सारखा हा घोडा स्पेशली बनवून घेतला आहे.. दोन लोक सतत रंगमंचावर राहून त्या घोड्याला ऑपरेट करत असतात.. सुरूवातीला आपल्याला हे थोडं विचित्र आणि डिस्टर्ब करणारं वाटतं पण हळू हळू त्या खोट्या घोड्याच्या प्रत्येक हालचालीतून त्याच्या भावना त्याच्या मनातले विचार आपल्याला जाणवू लागतात.. अगदी खर्‍यासारखी होणारी त्याची प्रत्येक हालचाल... त्याचं उधळण.. त्याचं धावणं.. तो वेग.. तो उन्माद.. ती उदासी.. तो घोडा खोटा राहत नाही.. आणि त्याच्या सोबतची ती दोन माणसं तर केव्हाच गायब झालेली असतात... त्या घोड्याच काम पाहणं आणि रंगमंचावर त्याचा जीवनपट पाहणं हे खरच आपल्याला स्पीचलेस करून सोडत.. याच कादंबरी आणि नाटकावरून 2011 साली स्टिवन स्पीलबर्ग ने त्याच नावाचा एक सिनेमा केलाय आणि तो सुद्धा तितकाच क्लासिक आहे जितकं हे नाटक...

वॉर हॉर्सची एक झलक : https://youtu.be/LCcFurXQ60M


वेस्ट एंड (लंडन) आणि Broadway (अमेरिका) यांच्या इतिहासात आपल्याला अजून अशी अनेक उदाहरण पहायला मिळतात.. डिसनीच्या लायन किंगने तर तिथल्या रंगमंचावर इतिहास घडवला आहे.. पाठोपाठ अलादिन, ब्युटी अँड द बिस्ट, फ्रोझन असे सिनेमवर आधारित अनेक प्लेज तिथे लोकांना भुरळ घालतायत.. ही नाटकं सिनेमाच्याही एक पाऊल वरचा व्हीज्युयल एस्क्पिरिअन्स लोकांना देतात.. तसंच शिकागो (प्ले – 1926 / फिल्म – 2002) सारखी अनेक उदाहरण ही आहेत ज्यात नाटकाचं अतिशय सुंदर रित्या सिनेमात रूपांतर झालेलं आहे..

आपल्याकडे रिसोर्स आणि बजेट मर्यादित असतील म्हणून असेल पण ज्या सफाईने आणि अविश्वसनिय रित्या त्या लोकांच्या कथा वस्तु एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जाताना दिसतात तितक्या सफाईदारपणे आपल्याकडे हे रूपांतरण होताना दिसत नाही.. आपल्याला वेगवेगळ्या व्यावसायिक गणितामध्ये अडकून बर्‍याचदा मूळ कथावस्तू सोबतच कॉम्प्रमाइज करायला लागतं.. (हे ऐकलेल्या घेतलेल्या अनुभवाचे बोल आहेत) पण होपफुली आता आपल्याकडे ही सगळ्याच बाबतीत सुधारणारा दर्जा पाहता लवकरच असं टेक्निकली दैदीप्यमान पहायला मिळेल याची खात्री वाटतेय... (साऊथने हे सुरू ही केलंय.. मराठीकडून आता खूप अपेक्षा आहेत..)

आणि जाता जाता अखेरची काही उदाहरण कथेच्या अगदीच अनपेक्षित रूपांतरणाची.. सिनेमावरुन बनलेली पुस्तकं.. हो अशी अनेक उदाहरण आहेत ज्यात सिनेमाच्या कथेवर आधारित पुस्तकं लिहिली गेली आहेत – स्टार वॉर्स, ब्लेड रनर : दी स्टोरी ऑफ फ्यूचर, एलियन VS प्रिडेटर, 30 डेज ऑफ नाइट. साऊथमध्ये म्हणाल तर बाहुबलीमधील पत्रांवर आधारित पुस्तकांची शृंखला येऊ घातली आहे.. आणि हिंदीसिनेमाच्या बाबतीत स्पेशल 26 वर आधारित एक त्याच नावाची थरारक कादंबरी सुद्धा लिहिली गेली आहे..


Image Sorce: Google Images

6 views0 comments

Comments


bottom of page